स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमकतेने सुस्त असलेला कृषी विभाग खळबळुन जागा…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मलकापूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मका पिकावर अळीचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्याने अळीने शेतातिल मका फस्त केल्याने मक्यातील 90% दाणे नष्ट झाला असून त्या शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन सुस्त असलेल्या कृषी विभागाला जागे करण्यासाठी चक्क कृषी कार्यालयात अळीसह नष्ट झालेला मका घेऊन कृषी अधीकार यांच्या टेबल वर सोडुन कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे..
प्रशासनाने पेरणी केलेल्या शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी करण्यात आली व येत्या पाच दिवसात न्याय मिळाला नाही. तर कृषी विभागात अंदोलन सुरु करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाअध्यक्ष सचिन शिंगोटे यांनी कृषीविभागाला दिला त्यावेळी बंटी राजपूत, शिवाजी हिवाळे, आदित्य धाडे, परेश देशमुख हे ज्ञानेश्वर चांभारे हे हजर होते.