भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बुलढाणा

समृद्धी महामार्गावर टिप्पर चा अपघात; 13 मजूर ठार, तिघे गंभीर जखमी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मलकापूर,जि.बुलडाणा, मंडे टू मंडे वृत्तसेवा। सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परला अपघात होऊन त्यात बसलले १६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत . यातील जवळपास १३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे . दरम्यान गंभीर जखमींना त्वरेने जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे . हा अपघात आज २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला .

मिळालेल्या माहितीनुसार दुसरबीड येथून लोखंडी गज घेऊन एक टिप्पर हे समुद्धी महामार्गच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तडेगाव येथील कॅम्पमध्ये जात होता . या टिप्परमध्ये समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूरही बसलेले होते . तडेगाव नजीक अचानक टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटला . त्यामध्ये असलेले मजूर गंभीर जखमी झाले असून यात जवळपास १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . मात्र त्यास किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही . अपघातातील गंभीर जखमींना त्वरित जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे .यातील तीन जखमींना सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे . या अपघातातील मृतांचा नेमका आकडा किती ही बाब अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नसल्याचे किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार म्हणाले . अपघातामधील गंभीर जखमी मजूर व मृतक हे मध्यप्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे . अपघाताची माहिती मिळातच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना त्वरित जालना येथील राणालयात अचारासाठी हलवण्यात आले . अपघातानंतर तडेगाव नजीक बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे . सोबतच या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.आज सकाळी एक टिप्पर काही मजूर व त्यात लोखंडी सळई घेऊन काम सुरू असलेल्या दिशेने जात होते . यावेळी समोरून आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटले . परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे . यातच अनियंत्रित टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाले . यामध्ये असलेले मजूर दूरवर फेकल्या केल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नी सांगितले . जखमींवर उपचार करण्यासाठी तत्काळ जालना येथे हलविण्यात आले .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!