सावद्यात भाजपकडून ‘मन की बात’ कार्यक्रमाचे मोठा स्क्रीन लावून प्रसारण !
सावदा, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधतात. यावेळी मन की बातच्या शंभराव्या भागाने सावदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मन की बातच्या शंभराव्या कार्यक्रमाचं थेट मोठ्या स्क्रिन लावून प्रसारण करण्यात आले.
ऑक्टोबर 2014 मध्ये सुरू झालेला मन की बात हा कार्यक्रम दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी शंभराव्या भागात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सावदा येथे भारतीय जनता पार्टी सावदा शहर च्या वतीने मन की बातच्या शंभराव्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण इंदिरा गांधी चौक सावदा येथे करण्यात आले. मन की बातच्या शंभराव्या भागाने जागतिक स्तरावर विक्रम प्रस्थापित केलेला आहे. त्याची नोंद घेत युनायटेड नेशन्स ने सुद्धा आजच्या कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत भारताशी असलेले संबंध दृढ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादित केले.
या भागामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या अनेक युवा उद्योजकांशी वार्तालाप करत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी मन की बात या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या उद्योग, व्यवसायाचा उल्लेख झाल्याने या उद्योजकांना त्यांच्या उद्योगांमध्ये फायदा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदरचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सावदा शहर च्या वतीने मोठा स्क्रीन व स्पीकर लावून प्रसारित करण्यात आला.
यावेळी सावदा भाजप शहराध्यक्ष जितेंद्र किसन भारंबे (जे.के.), बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका सौ सारिका चव्हाण, माजी नगरसेविका सौ रंजनाताई भारंबे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, अतुल ओवे, राकेश पाटील, महेश बेदरकर, गजानन भार्गव, पंकज बेदरकर, अतुल चौधरी, पोपट पाटील, आकाश, लतेश चौधरी, सचिन बऱ्हाटे, सर्वेश लोमटे, तुषार चौधरी, नकुल बेंडाळे, रितेश पाटील, सागर चौधरी, विजय पाटील, ऋषिकेश पाटील, नितीन खारे, अमोल पासे, कोमल चौधरी, भाऊ धांडे, भाजपा सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले व कार्यकर्ते सह परिसरातील नागरिक व्यापारी यांची उपस्थिती होती.