भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावखेडा, खिरोदा, चिनावल सह परिसरात खुलेआम सट्टा – मटका, अनेकांचे संसार उद्ध्वस्त,नव्याने रुजू झालेले सावदा एपीआय कारवाई करतील काय?

सावदा, ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा l रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशन हद्दीत सावदा शहरापासून जवळच असलेल्या सावखेडा खू. व बु. , खिरोदा, चिनावल, सह परिसरात सट्टा – मटक्याने जोर धरला असून या परिसरात गावोगावी राजरोसपणे खुलेआम दुकाने मांडली असून टपऱ्यावर कल्याण – वरली सट्टा मटका बिट घेतली जात असून यातून दररोज लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे सट्टा खेळणारांनीच सांगितले. सावदा पोलिस स्टेशनला नव्याने पदभार स्वीकारलेले सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी या पेढीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

सावदा पोलिस स्टेशन हद्दीत सावदा येथून जवळच असलेल्या सावखेडा खु. सावखेडा बु.खिरोदा, कळमोदा, चिनावल, कुंभारखेडा, लोहारा, जानोरी, चीचाटी , गौरखेडा, रोझोदा सह परिसरात सट्टा-मटका जोमाने सुरू आहे. या सट्टा मटक्याचे केंद्र बिंदू सावखेडा असून येथून सर्व परिसरातील सट्टा बिटिंग ची सूत्रे हलविली जातात. कितीही अवैध धंदे बंद केले तरी या सावखेडा येथील सट्टा पेढीचा व्यवसाय बिनबोभाट उघडपणे सुरू आहे. या बाबत स्थानिक ग्रामस्थांनी आतापर्यंत अनेक तक्रारी सुद्धा केल्या असल्याची माहिती मिळत असून पण तरीही ही सावखेडा येथील सट्टा पेढी बिनधास्त पणे सुरू आहे.याचे कारणही गावकऱ्यांकडून सांगितले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून बिनधास्त सुरू असलेल्या या सट्टा पेढीवर आता पर्यंत कुठलीही कारवाई केली असल्याचे ऐकिवात नाही.

नूतन एपीआय सावखेडा येथील सट्टा पेढी वर कारवाई करतील काय?
रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशन हद्दीत सावखेडा येथे सट्ट्याची पिढी बिनधास्त पणे खुलेआमं सुरू असून या सट्ट्याच्या पिढीचे एजेंट (बुकी) सावखेडा खु. सावखेडा बु. खिरोदा, लोहारा, जानोरी, चीचाटी , गौरखेडा सह, कळमोदा, रोझोदा, चिनावल, कुंभारखेडा, लोहारा, जानोरी, चीचाटी , गौरखेडा सह परिसरातील आदी गावांमध्ये टपऱ्यांवर स्पेशल कल्याण – वारली सट्टा-मटकाच लिहिण्याचे काम करीत असून सट्टा पट्टीची दुकाने मांडली आहेत, ही बिनबोभाट सुरु असलेली सट्टा पट्टीची दुकानांवर व मूळ सट्टा पेढीवर सावदा पोलिस स्टेशनला नुकतेच नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे कारवाई करतील काय? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!