भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

शेठ ला.ना.सा.विद्यालयात मराठी राजभाषा गौरवदिन उत्साहात साजरा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात गुरूवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत कविवर्य वी. वा.शिरवाळकर यांचा जन्म दिवस मराठी राज भाषा गौरवदिन म्हणून अतिशय आनंदाने आणि उत्साहात साजरा झाला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे सर, उपमुख्याध्यापक संजय भारुळेसर, जेष्ठ पर्यवेक्षक प्रशांत जगताप सर, संजय वानखेडे सर,ज्येष्ठ शिक्षिका सौ. आशा कुलकर्णी,सौ.पद्मजा जोशी, सुभाष पाटील, मराठी विभाग प्रमुख सौ. रेवती किन्हीकर ह्या मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, कवीवर्य कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.

श्रीमती. संपदा छापेकर ह्यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेचे महत्त्व, कुसुमाग्रज ह्यांचे मौलिक कार्य ह्याबद्दल माहिती सांगितली. ह्या प्रसंगी शाळेच्या दुपार विभागातील केशव मराठे, ध्रुव वाघ, जय जैनकार,हर्षदा महाजन ह्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील पाठ्यांश घटकावर अभिवाचन सादर केले.

तसेच मराठी भाषेविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देवेश चांदलीकर ह्याने मनोगत,तर सकाळ विभागातील संजीवनी मराठे लिखित “माय मराठी” कविता 5 वीच्या विद्यार्थ्यांनी समूहात तर ” मी कसे व्हावे” ही साने गुरुजींची कविता प्रथमेश माळी ह्याने वैयक्तिक सादर केली. तसेच “ही मायभूमी ही जन्मभूमी ही मायमराठी आमची “, “जय महाराष्ट्र ,जय निनादती चौघडे” ही गीते सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तमपणे सादर केली. त्यांना श्रीमती संपदा छापेकर, उल्हास ठाकरे, विद्यार्थी रुद्र सोनवणे ह्यांनी ढोलकी व तबल्यावर साथ संगत केली.

विद्यार्थीनींनी “गौरव महाराष्ट्राचा,” ही मायभूमी,जन्मभूमी ह्या गीतांवर समूहनृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली त्यांना श्रीमती नीलिमा सपकाळे ह्यांनी मार्गदर्शन केले. सोमनाथ महाजन सरांनी विद्यार्थ्यांकडून एक बाल कविता कृतीयुक्त म्हणवून घेतली. या प्रसंगी उपमुख्याध्यापक संजय भारुळे ह्यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून व्यवहारात जास्तीत जास्त मराठी भाषा वापरण्याचे आवाहन केले. केले. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.मनिषा वानखेडे यांनी तर आभारप्रदर्शन सौ. रूपाली महाजन ह्यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.संगीता पानट, उमेश ढाकणे , उल्हास ठाकरे, किशोर माळी, अशोक भालेराव, मोहन डांबरे,सौ. अडकमोल,संगणक विभाग तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी ह्यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!