भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावधरणगाव

गांजाची तस्करी : वाहनातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत ४० किलोपेक्षा अधिक गांजासह एक चारचाकी जप्त केले असून आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २० लाख १० हजार ६०० रुपये इतकी आहे. ही कारवाई जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलिसांनी अमळनेर चौफुली परिसरात केली.

अधिक माहिती अशी की, सविस्तर दिनाक ८ ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास चोपडा रोडकडून येणाऱ्या मेटालिक सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट डिझायर एम एच ०१ डी पी ०२५२ या क्रमांकाची चारचाकीला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने वाहन न थांबवता शहराकडे वेगाने पळ काढला. यावेळी सत्यवान पवार , सुधीर चौधरी व किशोर भोई यांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग केला असता पारोळा नाक्याजवळील रेल्वे बोगद्याकडे जाताना त्या गाडीला पकडण्यात आले मात्र वाहनचालकाने वाहन सोडून तेथून पळ काढला.

सदर वाहन तपासणी केली असता त्या वाहनातून ४० किलो ४२४ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा आढळून आला आहे. या गांजाची किमत १० लाख १० हजार ६०० रुपये असून वाहनासह एकूण २० लाख १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पाेलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी वाहना चालकाविरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!