भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

लाखो रुपयांचा गांजा पकडला, दोघे मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा शिवारातील धामणगाव फाट्याजवळ बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडून त्यांच्या कडून ११.१९४ किलो ग्राम वजनाचा सुमारे २, २३,८०० रुपयांचा गांजा जप्त केला.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुऱ्हा दुरश्रेत्र येथे दि. १६ मे २०२५ रोजी ५.३० वाजेच्या सुमारास काकोडा शिवारातील धामणगाव फाट्याजवळ देशकुंडा हनुमान मंदिराजवळ नाल्याकडे जाणारे रोडवर आकाश उर्फ संतोष विष्णु रावळकर, वय २७ वर्षे, रा. कु-हा ता. मुक्ताईनगर, आणि पवन संजय जवरे, वय २७ वर्षे, रा. कु-हा ता. मुक्ताईनगर हे दोघे मनोसंस्थेवर परिणाम करणारा अंमली पदार्थ गांजा कब्जात बाळगुन त्याची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आले. या दोघांकडून पांढरे रांगाचे गोणीमध्ये असलेला २ लाख २३ हजार ८०० रुपये किमतीचा ११ किलो १९४ कि.ग्रॅ. वजनाचा काळसर हिरव्या रंगाचा उग्रवासाचा ओलसर गांजा, वास घेवुन खात्री करून जप्त केला. पोना हरीश गवळी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मुक्ताईनगरचे पोनि. नागेश मोहिते, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पोउपनि नयन पाटील,पोना नंदकिशोर धनके, हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!