यावल तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका ३८ वर्षीय विवाहितेने यावल तालुक्यातील फैजपूर शहराच्या बाहेर सावदा – रावेर रस्त्यावरील शेतात झोपडीमध्ये विवाहितेने गळफास घेतल्याची घटना गुरुवार दि. १९ रोजी उघड झाली.
अधिक माहिती अशी की,मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर तालुक्यातील भोलाणे येथील मुळची रहिवासी असलेल्या परंतु कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी फैजपूर येथे फैजपूर सावदा रोड वरील एका गॅरेज मागील शेतात झोपडी करू रहात असलेल्या गीता प्रताप बारेला (वय ३८) या महिलेने १९ डिसेंबर गुरूवार रोजी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
यानतंर त्या विवाहितेला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करुन तिला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गीता बरेला या महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.