विवाहितेवर लैंगिक अत्याचार, चाकूने वार करून पतीसह मुलाला ठार करण्याची धमकी
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिच्या डोक्यावर व हातावर चाकूने वार करून तिला जखमी करण्यात आल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली असून याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात कुटुंबासह रहात असलेल्या एका ४५ वर्षीय विवाहितेला त्याच गावात राहणारा भैय्या उर्फ अमोल दिलीप सुर्यवंशी याने तिच्या पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेला व्हिडीओ कॉल करून अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडले, आणि तिच्या डोक्यावर व हातावर चाकूने वार करीत दुखापत केली.
या संदर्भात विवाहितेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने भैय्या उर्फ अमोल दिलीप सुर्यवंशी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक पवार हे पुढील तपास करीत आहेत.