पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुलाला व पतीला ठार मारण्याची धमकी देत हॉटेल मध्ये नेवून विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देवून शारिरीक व मानसिक छळ करून पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील काशीराम नगरात राहणारा एका ३२ वर्षीय महिलेला जळगाव शहरातील हॉटेल प्रगती पॅलेस येथे संशयित आरोपी विनोद रामचंद्र पाटील रा.श्रावण नगर, जळगाव याने विवाहितेवर अत्याचार केला. तसेच फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी व फिर्यादीचे पतीकडून पैसे घेतले, त्यानंतर पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार ८ जुलै २०२२ ते १२ जून २०२३ दरम्यान घडला आहे.
![](https://i0.wp.com/mondaytomondaynews.com/wp-content/uploads/2025/01/img-20250125-wa00174874377617960607667.jpg?resize=800%2C536&ssl=1)
![](https://i0.wp.com/mondaytomondaynews.com/wp-content/uploads/2025/01/img-20250125-wa00174874377617960607667.jpg?resize=800%2C536&ssl=1)
अखेर या संदर्भात पीडित महिलेने अखेर सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता तक्रार दिल्याने विनोद रामचंद्र पाटील यांच्यावर शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियादारी करीत आहेत.