माझ्याशी लग्न कर, अन्यथा “मी आत्महत्या करून तुला फसवेल” महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धमकी
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | माझ्याशी लग्न कर, अन्यथा “मी आत्महत्या करून तुला फसवेल” अशी धमकी महाविद्यालयीन विद्यार्थिनीला देऊन तिचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना भुसावळ शहरात घडली. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरात रहिवाशी असलेली २१ वर्षीय विद्यार्थिनी भुसावळ येथे खाजगी क्लासेसला जाते. याच दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून दर्शन अनंत चिंचोले, वय २१ वर्षे रा.भुसावळ, हा या तरुणीचा पाठलाग करत होता. तो तिला प्रेमसंबंध ठेवण्याची आणि लग्न करण्याची नेहमीच मागणी करत होता
दरम्यान, शुक्रवार ९ मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास दर्शन चिंचोले याने तरुणीचा हात पकडला आणि तिला धमकी दिली की, माझ्याशी प्रेम संबंध ठेऊन माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करून तुला फसवेल. अशी धमकी दिली.
घाबरलेल्या तरुणीने तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल असून विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दर्शन अनंत चिंचोले, वय २१ वर्षे रा.भुसावळ, याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.