भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

ज्या मशिदीवर भोंगे लागतील, त्यासमोर हनुमान चालीसा लावू : राज ठाकरे

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी असून प्रार्थनेला माझा विरोध नाही. मशिदीवर लागलेले भोंगे खाली उतरावावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय नाही घेतला तर मशिदीसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावू असा इशारा देत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रखर हिंदुत्वावर भाष्य केले आहे.

अलीकडच्या काळात मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा चर्चेत असतांना राज ठाकरे यांनी भोंगे काढण्याची मागणी केली. जेथील भोंगे काढले जाणार नाहीत त्या मशिदींच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार असल्याचा इशारा सुध्दा त्यांनी दिला असून राज ठाकरे पुढे म्हणाले, आपण अयोध्या येथे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असून लवकरच तारीख जाहीर करू. मुंबई महापालिकेला सत्ताधारी शिवसेनेने अक्षरश: ओरबडून घेतले आहे. यांच्या डोळ्यासमोर मुंबईत अनेक ठिकाणी बेहरामपाडे उभे राहिलेत. मात्र यांनी काहीही केले नाही. यांनी फक्त पैसे कमावण्याचे काम केले. मुंबईला बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मुख्यमंत्रीपदाचा मोह धरल्यामुळे उध्दव ठाकरे यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा घणाघात त्यांनी केला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जातीपातीचे राजकारण करत असल्याचे सांगत शरद पवार यांना धारेवर धरले. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. त्यापूर्वी महाराष्ट्रात जात हा विषय केवळ अभिमानापुरता मर्यादित होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण झाला. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून आमिषं दाखवून समाजात फूट पाडण्यात आली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या इतिहासकारांना केवळ ब्राह्मण असल्याच्या मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात आले.

बाहेरच्या राज्यांमध्ये आजघडीला जे राजकारण सुरु आहे, ते आपल्याला करायंच आहे का? पुरोगामी महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणात खितपत पडलेले बघायचे आहे का, असे सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी उपस्थित केले. मुळात आपण या जातीपातींमधूनच बाहेर पडलो नाही तर हिंदू कधी होणार, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. या भाषणात आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील पक्षातर्फे उत्साहाने साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तर बेहरामपाड्यातील मदरशांवर धाडी टाकल्यास यातून भयंकर बाबी समोर येतील असा दावादेखील केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!