ब्रेकिंग : भाजपा पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे; जिल्हाध्यक्ष अमोल जावळेना डावलून रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने नाराजी
सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २० जागांवर उमेदवारांची आज घोषणा केली आहे. यात रावेर लोकसभा मदारसंघांत अनेक पदाधिकाऱ्यांनी दिवंगत खासदार हरीभाऊ जावळे यांचे पुत्र तथा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी न दिल्याने असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हे भालोद या गावात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी त्यांच्याकडे सामूहिकरित्या राजीनामे दिल्याने मतदासंघांत मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपचे निष्ठावंत नेते दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच् रावेर लोकसभेसाठी त्यांच्या नावाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने त्यांना उमेदवारी जाहीर व्हावी अशी इच्छा कार्यकत्यांची होती जावळे यांचे नाव आघाडीवरही असल्याची चर्चा पक्षीय वर्तुळात होती मात्र, रावेर मधुन विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आपले सामुहिक राजीनामे दिले असून पक्षाकडून सातत्याने जावळे कुटुंबावर अन्याय होत असल्याचे सांगत पुर्वी स्व.हरिभाऊ जावळे यांच्या संदर्भात जे झालं तेच अमोल जावळे संदर्भात होत असल्याचा सूर व्यक्त केला. मिळालेला माहिती नुसार राजीनामे देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वाढ होणार असल्याचे दाट शक्यता आहे. पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळत आहे.
विद्यमान खासदार रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांची नाराजी असल्याची माहिती मिळत असून सोशल मीडियावर कार्यकर्ते संदेश शेयर केला जात आहे त्यात म्हंटले आहे की,
माननीय आमदार कृषी मित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या कडे रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व मतदार एका आशेने एका दूरगामी व्हिजन ने अमोल जावळे यांच्याकडे बघत असतानाच पक्षावर चिखल फेक करणारे नाथाभाऊ यांना घाबरून भाजपाने त्यांच्या शुष्ना रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर करून पुन्हा एकदा परीसरातील जनतेवर आणि सच्या भाजप कार्यकर्त्यांवर खूप मोठा अन्याय केल्याचे चित्र आज दिसून आले. स्वर्गीय. हरिभाऊ जावळे त्यानंतर अमोल जावळे यांच्यावर झालेल्या अन्यायावरून भारतीय जनता पार्टी वरील विश्वास पक्षाच्याच कार्यकर्त्यां चा हळू हळू कमी झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. असे त्यात म्हटले आहे.