भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

हॉटेल सावन येथे भीषण आग,२५ ते ३० लाखांचे नुकसान

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज डॉ.दीपक लोखंडे | भुसावळ- जळगाव रोडवरील तरसोद फाट्याजवळ असलेल्या हॉटेल सावन येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये पीओपीचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि त्याचे रूपांतर मोठ्या आगीत झाले. पीओपी साहित्यामुळे आगीने झपाट्याने पेट घेतला.

घटनास्थळी नशिराबाद अग्निशमन दल यांच्या दोन गाड्या तात्काळ दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या वेळीच पोहोचल्यामुळे मोठी हानी टळली. सुदैवाने, हॉटेलमधील मजूर दुसऱ्या खोलीत झोपलेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, हॉटेलमधील पाच गॅस सिलेंडर वेळेवर बाहेर काढण्यात आल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
हॉटेल मालकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या आगीत अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!