चाळीसगावात मिरची बाजारात भीषण आग, ट्रॅक हा दुचाकीसह १२ दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान
चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील नागद रॊडवर असलेल्या मिरची बाजाराला अचानक मोठी भीषण आग लागून या आगीत १२ दुकाने जळून खाक झाली त्याच बरोबर एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली असून ५० लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चाळीसगाव शहरात नागद रोडवर मोठा मिरची बाजार भरतो. या बाजारात शहर व परिसरातील अनेक व्यापारी त्यांचे दुकाने लावून व्यवसाय करतात. शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे बाजारात गजबज असताना अचानक बाजाराला एका बाजूने आग लागण्यास सुरुवात झाली. या आगीने मोठे रौद्र रूप धारण केल्याने एकच मोठी धावपळ सुरू झाली.
बाजारातील लोक व व्यापारी दुकानदार धावपळ करत बाजाराच्या बाहेर निघायला लागले. बाजारात लागलेल्या दुचाकी बाहेर काढायला लोकांनी सुरुवात केली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच तत्काळ ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. बाजाराच्या बाजूला असणारा डॉ. अविनाश जाधव यांचा अविरेखा पेट्रोलपंपाजवळ आग जाणार होती. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझविण्यास सुरुवात केल्याने हा पेट्रोलपंप आगीच्या चपेट्यात आला नाही. पेट्रोलपंप थोडक्यात वाचला.
मात्र या आगीत १२ दुकानांसह एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली असून सुमारे ५० लाखाच्यावर नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीचे रूप इतके भयंकर होते की सुमारे ५ किलोमीटरपर्यंत आगीचा धूर दिसून येत होता. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेत मदतीचे तत्काल प्रयत्न केले.
दरम्यान या आगीत कोणतीही जिवित हानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची आणि इतर शेतमालाचा साठा होता, जो या आगीत जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.