मतीन अहमद खान यांचे बी.यू. एम. एस. परीक्षेत प्रथम श्रेणी!
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथील मतीन अहमद खान यांनी मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या चतुर्थ व्यावसायिक बी.यू.एम.एस. (आरएस५) परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा मान अभिमानाने उंचावला आहे. गुलबर्गा येथील इनामदार युनानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे शिक्षण घेणाऱ्या मतीन यांनी एकूण १७४० पैकी ११०६ गुण (एक हजार एकशे सहा) मिळवले.
सावदा येथील संजरी डिजिटल स्टुडिओचे संचालक व पत्रकार अजहर खान यांचा भाचा मतीन याच्या यशाबद्दल त्यांच्या आई श्रीमती राबिया बी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला.विशेष म्हणजे, मतीन हे खान कुटुंबातील पहिले डॉक्टर ठरले असून, त्यांच्या या यशाने संपूर्ण खानदानाचा गौरव वाढला आहे. कुटुंबीयांनी आणि सावदा गावातील नागरिकांनी मतीन यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मतीन यांनी युनानी वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असून, त्यांच्या या यशामुळे गाव आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे. मतीन यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली गेल्यानंतरही त्यांनी स्वतःच्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने मिळवलेले हे अभूतपूर्व यश खरोखरच प्रेरणादायी आहे!