भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

“तू तुझ्या घरी सांगितले. तर तुझीच तक्रार करेन” शिक्षकाने दिला दम, शिक्षकाचे पाचवीतल्या मुलीशी अश्लील कृत्य

नाशिक, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात अजाण लहान मुलींवर होत असल्याच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या बंद होण्याचं नाव घेत नसताना आणखी एक घटना समोर आली. रोजच नवीन नवीन घटना समोर येत आहे. त्यातच नाशिकमधून शालेय विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

शिक्षकांचे विद्यार्थ्यांना ज्ञान दान करण्याचे काम असताना राज्यात शिक्षकांकडूनच लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. नाशिक मध्ये उपेंद्रनगर भागातील खासगी क्लासमधील शिक्षकाने पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अंगलट करून अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इतकेच नव्हे तर “तू तुझ्या घरी काही सांगितले. तर उलट तुझीच तक्रार करेन” असा दम या शिक्षकाने दिला. विशेष म्हणजे विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनांमध्ये शिक्षकच अग्रेसर असल्याचे दिसत असल्याने शिक्षिका पेशाला हा मोठा काळीमा फसला जात आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशि की, नाशिक मधील उपेंद्रनगर येथे ज्ञानेश्वरी कोचिंग क्लासेस हा खासगी क्लास कृष्णा गजानन दहिभाते आणि त्याची पत्नी चालवते. कृष्णा दहिभाते विद्यार्थ्यांना विज्ञान व इंग्रजी विषय शिकवतो तर त्याची पत्नी गणित व इतर विषय विद्यार्थ्यांना शिकविते. दिनांक २२ ऑगस्ट रोजी कृष्णा दहिभाते याने त्याच्याच क्लासमधील पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट करत या विद्यार्थीबरोबर अश्लील कृत्य केले. वरून “तू तुझ्या घरी काही सांगितले. तर उलट तुझीच तक्रार करेन”, असा दम या शिक्षकाने दिला.

पिडीत मुलगी घाबरून क्लास सुटल्यानंतर  थेट घरी गेली. मुलगी घाबरलेल्या ,भेदरलेल्या अवस्थेतच घरी आली, मुलगी घाबरलेली दिसताच तिच्या आई-वडिलांनी विश्वासात घेऊन तिला नेमकं काय घडलंय? तू एवढी घाबरलेली का आहेस असं विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही, असे तिने पालकांना सांगितले. पालकांनी यामागील कारण विचारले असता पीडित विद्यार्थीनीने क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली.

शुक्रवारी सकाळी विद्यार्थिनीच्या पालकांनी ज्ञानेश्वरी कोचिंग क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नीस मुलीने सांगितलेली बाब सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी बरोबरच त्याच्या पत्नीने सुद्धा या बाबत कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांनी अंबड पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने , दिलेल्या फिर्यादी नुसार क्लास चालक कृष्णा दहिभाते विरोधात ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल रात्री करून अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!