भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलराजकीय

सदस्यता नोंदणी : “विचारधारा आणि विकास कार्याला लोकांच्या हृदयात स्थान देण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग” : आ. अमोल जावळे

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l “भारतीय जनता पार्टीची ताकद तिच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आपल्याला या महत्त्वाच्या काळात एकत्र येऊन अधिकाधिक सदस्यांची नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकाला भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडून, देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची संधी दिली पाहिजे. सदस्यता नोंदणी फक्त संख्या वाढविण्याचा प्रयत्न नाही, तर आपल्या विचारधारेला आणि विकासाच्या कार्याला लोकांच्या हृदयात स्थान देण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. आपली ही कडी अधिक मजबूत होईल, आणि आपण एक सशक्त संघटन तयार करू, जे सर्व लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत असेल.” अश्या भावना या प्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केल्या.


सखाराम महाजन पतसंस्था “डॉ. हेडगेवार सभागृह,” भालोद येथे भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल मंडळाची मंडळस्तरीय बैठकी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून तयारी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीत नमो अॅपवरील सदस्यता लिंक किंवा 880 000 2024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन जास्तीत जास्त नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. KXNN9K हा रेफरल कोड वापरून सदस्यता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष शरद दादा महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, डॉ. कुंदन फेगडे, नारायण बापू चौधरी (किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष), उमेश फेगडे (यावल मंडळ अध्यक्ष), विलास चौधरी (तालुका सरचिटणीस), उज्जैसिंग राजपूत (तालुका सरचिटणीस), भरत महाजन, जयश्री चौधरी (तालुका महिला आघाडी अध्यक्ष), सविता भालेराव (जि.प सदस्य), राकेश फेगडे (बाजार समिती सभापती), नागेश्वर सावळे (बहुजन आघाडी), पुरोजीत चौधरी, सागर कोळी (युवा मोर्चा तालुका अध्यक्ष), नितीन चौधरी (जिल्हा दूध फेडरेशन संचालक) यासह भारतीय जनता पक्षाच्या सर्व आघाड्यांचे सन्माननीय जिल्हा व मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू-भगिनी, लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ केंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे संघटन अधिक सक्षम आणि प्रभावी बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!