रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले
केऱ्हाळा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. सतीश निकम l रावेर तालुक्यातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार रावेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. सदर प्रकार लक्षात आल्यावर या संदर्भात रावेर पोलिस स्टेशनला तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.