क्राईमचोपडा

लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती

चोपडा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l चोपडा तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला ” मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करेन ” असे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला त्या नंतर नराधमाने तिला जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. या प्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कुटुंब राहत असून त्यांची १५ वर्षीय तरुणी सोबत राहते.

दि. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वारंवार शांतीलाल वसंत पावरा याने,” मी तुझ्याशी प्रेम करतो. तुझ्याशी लग्न करणार आहे” असे म्हणून त्याच्या घरात तरुणीवर वारंवार अत्याचार केला.

या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली.त्या नंतर ‘ ही घटना कोणाला सांगितल्यास जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी शांतीलाल वसंत पावरा याने तरुणीला दिली. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शांतीलाल वसंत पावरा
याला अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!