क्राईमचाळीसगावजळगाव

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला .

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील सोमनाथ प्रकाश चव्हाण याने गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पिडीत मुलीला घरी जबरदस्ती बोलावून घेतले आणि तिच्या अत्याचार केला. हा तिच्यावर अत्याचार केल्याने पिडीत मुलगी ही तीन महिन्याची गरोदर राहिली. हा प्रकार लक्षात आल्यावर नातेवाईकांनी तातडीने चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून सोमनाथ जाधव यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!