अल्पवयीन तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, तरुणी गर्भवती
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तुला काम मिळवून देते त्यातून तुला भरपूर पैसे मिळतील असे अमिष दाखवत १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला वेगवेगळ्या पुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पडल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव मध समोर आला आहे. आणि याच प्रकारातून यामध्ये अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली. जळगाव येथील कोल्हे नगर परिसरात जून ते ऑगस्ट २०२५ या दरम्यान हा असा प्रकार सुरू होता.
जळगाव मधील तुकाराम वाडीतील एका तरुणीने
रामानंद नगर परिसरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीशी ओळख करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे काम केल्यास तुला खूप पैसे मिळतील असे सांगून रामानंद नगर परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीची सतीश उर्फ मनोज सुभाष पाटील व सरला सतीश पाटील (दोन्ही रा. पौर्णिमा बंगला, कोल्हेनगर) या दोघांशी ओळख करून दिली.
त्या नंतर त्या तरुणीने या अल्पवयीन तरुणीला पांडे डेअरी चौकात रात्री १० वाजता बोलावून तेथे सतीश पाटील व सरला पाटील यांच्यासह एक अनोळखी पुरुष कारमध्ये आले व ते तिला घेऊन गेले.रात्रभर तिला तेथेच ठेऊन तिला पैशाचे अमिष दाखवत वेगवेगळ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. प्रति व्यक्तीप्रमाणे या मुलीला ५०० रुपये देण्यात आले. हा प्रकार सतीश पाटील याच्या घरीच सुरू असायचा. या प्रकारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.
सदर तरुणीचे व तिच्या आईचे ४ सप्टेंबर रोजी भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली. सुरुवातील भुसावळ व तेथून कोल्हे नगरात पौर्णिमा बंगला येथे ती आली. तिच्या शोधात जिल्हा पेठ पोलिस पौर्णिमा बंगला येथे गेले व तिला पोलिस ठाण्यात आणले.पोलिसांनी तिला तिच्या आई सोबत घरी जाण्यास सांगितले. मात्र त्या तरुणीने तिच्या आई सोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला बालसुधार गृह व नंतर शासकीय आशादीप वसतिगृहात दाखल करण्यात आले. दरम्यान, तरुणीची प्रकृती खराब झाल्याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे समोर आले.
सदर पीडित तरुणीने या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार सतीश पाटील, सरला पाटील या पती पत्नी सह तुकाराम वाडीतील तरुणी विरोधात बलात्कार, पोक्सो तसेच पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

