भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीने दिला अत्याचारातून बाळाला जन्म

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर केलेल्या अत्याचारातून तिने एका मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन परिसरात घडली.

मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील निंभोरा परिसरात कुटुंबासह रहात असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातच राहणारा करण प्रकाश भिल वय २१ रा. बिलवाडी ता.रावेर याने पिडीत मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना १ डिसेंबर २०२३ घडली होती. तेव्हापासून पीडीत मुलगी ही अल्पवयीन असतांना सुद्धा त्याने तिच्यावर अत्याचार केला.

या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. हि घटना उघडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी निंभोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता आरोपी करण प्रकाश भिल वय २१ रा. बिलवाडी ता.रावेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सपोनि हरीदास बोचरे हे करीत आहे.

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!