लग्नाचे आमिष दाखवत अत्याचारातून अल्पवयीन तरुणीने दिला बाळाला जन्म
चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन युवतीवर नात्याने चुलत मामेभाऊ असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली व तिने बाळाला जन्म दिला. या बाबत आरोपी तरुणा विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी घरात एकटी असताना नात्याने चुलत मामेभाऊ असलेला तरुण तिच्या घरी येऊन तिला आपण लग्न करू, असे आमिष दाखवत पीडित तरुणीशी बळजबरीने शरीरसंबंध केले. तसेच कोणास काहीही सांगू नकोस, नाही तर मी तुला बघून घेईल, अशी धमकी दिली. व आरोपी ऊसतोडीच्या कामावर निघून गेला. पिडीत तरुणीला आरोपी तरुणाने धमकी दिल्याने तरुणी घाबरून जावून घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही.
मात्र काही दिवसांनी तरुणी ऊसतोडणी निमित्त परिवारासोबत बाहेरगावी पुण्यात गेल्यावर तिला त्रास जाणवू लागल्याने तरुणीला तपासणी करण्यासाठी दवाखान्यात घेवून गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर प्रकाराने कुटुंब घाबरून जाऊन या प्रकरणी पीडित अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.