क्राईममुक्ताईनगर

अल्पवयीन तरुणीचे अपहरण, पेपर देण्यासाठी गेली, परत आलीच नाही

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी बारावीची परीक्षा देण्यासाठी पेपरला घरून सकाळी गेली होती परंतु ती घरी परत आलीच नाही. कॉलेजच्या गेटजवळून त्या तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना ११ फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय तरूणी बारावीचा पेपर देण्यासाठी सकाळी घरातून निघाली होती. मात्र, परीक्षा संपल्यानंतर ती घरी परतली नाही. त्या मुळे कुटुंबियांना चिंता वाटून राहिली.

कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तुषार शत्रुघ्न पाटील (ता. मुक्ताईनगर) याने तिला फूस लावून पळवून नेले असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली.

याबाबत तरुणीच्या पालकांनी तत्काळ मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तुषार पाटील याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संतोष चौधरी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!