क्राईमरावेर

रावेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ऐनपुर, ता.रावेर, मंडे टु मंडे न्युज, प्रतिनिधी l विजय के अवसरमल l रावेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा  विनयभंग केल्या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशन येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील संशयित आरोपी राहत असलेल्या भागातच एका अल्पवयीन मुलीची छेडछाड, शिवीगाळ तसेच धमकी देत संशयीत आरोपी विशाल सुरेश जैतकर (वय 22 वर्ष) रा. ऐनपूर याने विनयभंग केला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून संशयीत आरोपी विशाल सुरेश जैतकर विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.192/24 भा.न्या.स. कलम 74,78, 333, 115(2), 352,(2) सह पोस्को कायदा कलम 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!