परप्रांतीय अल्पवयीन मुलीने आत्यचारातून दिला गोडस बाळाला जन्म
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आत्यचारातून गर्भवती राहिल्याने नुकताच तिने बाळाला जन्म दिला. सदर अल्पवयीन मुलगी मध्यप्रदेशातील असून गेल्या दोन वर्षांपासून जळगाव तालुक्यातील भादली या गावात आपल्या पालकांसह वास्तव्याला आहे.
मध्यप्रदेशातील मूळ रहिवाशी असलेली मुलगी गेल्या दोन वर्षांपासून जळगाव तालुक्यातील भादली या गावात राहत असून याच परिसरात राहणारा चमासिंग बिलाला वय २२ वर्ष हा अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षापासून धाकदापट करत अत्याचार करीत आहे.त्या अत्याचाराने पिडीत मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस स्टेशनला आरोपी चमासिंग बिलाला वय २२ वर्ष याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.