भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

जामनेर येथे जि. प. मालकीच्या भूखंडावर गैरव्यवहार– आ. एकनाथराव खडसे

नागपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर गैरव्यवहार झाल्याबाबत
आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करत चौकशीचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. त्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

एकनाथराव खडसे म्हणाले, जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वांवर व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे, हे खरे आहे काय, या बांधकामात गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी व श्री विजय भास्कर यांनी दिनांक 30 मार्च 2021 रोजी व त्या सुमारास शासनाकडे केली आहे या संदर्भात शासनाने चौकशी केली आली आहे काय ? चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषीवर कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे, व कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत असा एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला

यावर ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर देताना सांगितले, जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वांवर व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे, या बांधकामात गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी व श्री विजय भास्कर यांनी दिनांक 30 मार्च 2021रोजी शासनाकडे केली आहे. सदर प्रकरणी ॲड विजय पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने दिनांक 23 मे 2022 रोजी च्या शासन निर्णयानुसार चौकशी समिती गठीत केली असुन चौकशी समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झालेला नाही असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी खडसेंच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!