भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

शेती रस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आ. अमोल जावळेंचे ठोस पावले, पाणंद रस्त्यांबाबत घेतली आढावा बैठक

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेतकऱ्यांच्या शेती रस्त्यांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी नुकतीच पाणंद रस्त्यांबाबत फैजपूर येथे सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. मातोश्री पाणंद रस्ते योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, २०२२ पासून मंजूर झालेले अनेक रस्ते अद्याप अपूर्ण असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

तत्काळ या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदारांनी सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली. या बैठकीला महसूल विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मिशन मोडमध्ये राबवण्याची गरज
बैठकीदरम्यान, आमदारांनी या योजनेला मिशन मोडमध्ये राबवण्याची गरज असल्याचे ठळकपणे नमूद केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधावा आणि कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले. शेतकऱ्यांसाठी रस्त्यांच्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रशासनाने अधिक गांभीर्याने काम करावे आणि वेळेत मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असा आग्रह आमदारांनी धरला.

२६ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत
भविष्यात अधिकाधिक रस्ते मंजूर करण्याच्या दृष्टीने येत्या २६ जानेवारी रोजी ग्रामसभांमध्ये रस्त्यांच्या कामांचे ठराव मंजूर करण्याचे निर्देश आमदार अमोल जावळे यांनी दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे. शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि मातोश्री पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे आमदारांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावेळी शासकीय यंत्रणांना भेडसावणाऱ्या अडचणीही आमदारांनी समजून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला प्रांताधिकारी बबनराव काकडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना मोरे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी  वानखेडे , गटविकास यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!