विधान परिषद निवडणुकीत भाजपची बाजी, पाचही उमेदवार विजयी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विधान परिषदेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. दहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे.
राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, भाजपाचे राम शिंदे, प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, उमा खापरे, शिवसेनेचे आमशा पाडवी, सचिन अहिर आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले.
विजयी उमेदवार –
भाजप
प्रसाद लाड 26 विजयी
उमा खापरे – 26 विजयी
राम शिंदे – 26 विजयी
प्रविण दरेकर – 26 विजयी
श्रीकांत भारतीय – 26 विजयी
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. यावेळी शिवसेनेनं कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता.