रोहिणी खडसेंनी नाराज दिलीप मोहितेनां थेट अजितदादांच्या कॅबिनपर्यंत नेले !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज आमदार दिलीप मोहिते अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना घेण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या गेल्या होत्या. त्यांनी थेट अजितदादांच्या केबिनपर्यंत मोहिते यांना नेले. मुंबईत येताच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला त्यांच्या केबिनमध्ये गेले आहेत. या वेळी त्यांनी अजित पवार सांगतील, त्यांना मतदान करणार असल्याचे बोलताना सांगितले.
- …आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध, लवकरच बिगूल वाजणार ?
- राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर
- संपूर्ण जळगाव जिल्हा भगवामय, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा महायुतीच्या ताब्यात
राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशीही खेड मतदारसंघातील कामे होत नसल्याबद्दल आमदार दिलीप मोहिते हे नाराज आहेत. त्यांनी याबाबत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत कामे होत नसल्याची तक्रार केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करत समजूत घातली होती. त्यानंतर ते मतदानाला तयार झाले होते. मात्र, त्यावेळी त्यांना विधान परिषद निवडणुकीपूर्वी तुमची कामे मार्गी लागतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, ती अद्याप मार्गी न लागल्याने मोहिते यांची नाराजी अद्याप कायम आहे.
अजित पवार यांच्या केबिनला जाण्यापूर्वी त्यांना कोणाला मतदान करणार असे प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांना सांगतील त्यांना मी मतदान करणार आहे, असे कॅमेऱ्यासमोर स्पष्टपणे सांगितले. आमदार मोहिते यांना घेण्यासाठी एकनाथ खडसे यांना कन्या रोहिणी खडसे गेल्या होत्या. त्यांनी मोहिते यांना थेट अजितदादांच्या केबिनपर्यंत नेले.