भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

…तर आम्ही शांत बसणार नाही; १ मे रोजी जाहीर सभा घेणार– राज ठाकरें

पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : ‘आमच्याकडून मिरवणुका निघतात त्या मिरवणुका निघाल्यानंतर जर समजा त्याच्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही काय शांत बसणार नाही. आमचे हात काय बांधलेले नाही. दगड आम्हालाही हातात धरता येतो.’ असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी आज (१७ एप्रिल) पत्रकार परिषदेत पुन्हा मशिदीवरील भोंग्यांवरून तोफ डागली. १ मे रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार असून ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ आणि ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली, या गोष्टी सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली.

राज ठाकरे म्हणाले, “येथे एका मुस्लिम पत्रकारांनी आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितले की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येते, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही देखील होतो. त्यामुळे भोंग्याचा त्रास फक्त हिंदुंना होत नाही तर मुस्लिमांनाही होतो. यामुळे भोंग्याचा सामाजिक आणि धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. देशातल्या सर्व हिंदू बांधवांनी माझी विनंती आहे की, तुम्ही तयार रहा. आता रमजान सुरू आहे, म्हणून काही करायचे नाही. ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ,” असे ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, “भोंग्याचा सामाजिक आणि धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. दोन गोष्टी आपल्याशी बोलयाच्या होत्या म्हणून पत्रकार परिषद घेतली. भोंग्याचा त्रास फक्त हिंदुंना होत नाही तर मुस्लिमांनाही होतो. ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ. महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. पुढील सभा ही १ मे रोजी संभाजीनगरमध्ये घेणार आहे. ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली.”

‘मला हेच समजत नाहीए की, सगळ्या मशिदीवरील लाऊड स्पीकर हे अनधिकृत आहेत ते काढले जात नाही. मग आमच्या मुलांनी केलेल्या गोष्टी या अनधिकृत तुम्ही कशा काय मानता?’

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!