क्राईमजळगाव

ब्रेकिंग : पोलिस पथकावर जमावाचा हल्ला, झटापटीत महिला पोलिस गंभीर जखमी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला, अपहरण, धक्काबुक्कीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी चोपडा येथील पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. त्या नंतर धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करण्यात आली होती. आता पिंप्राळा हुडको परिसरात २० फेब्रुवारी बुधवार रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पथकावर जमावाने हल्ला चढवत त्यांच्याशी झटपट झाली. त्या झटापटीत एका महिला पोलिसाच्या गळ्यातील मंगळसूत्रही तुटून हरवले. झटापटीत दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात प्रेमविवाहानंतर झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर काही संशयित अजून फरार आहेत. या संशयितांना पकडण्यासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलिस पथक पिंप्राळा हुडको परिसरात गेले होते.

मात्र पोलिसांचे पथक पिंप्राळा हुडकोत पोहोचताच तेथे जमलेल्या जमावाने त्यांना घेरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वेळी मोठा वाद निर्माण झाला. पोलिस संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने पोलिसांना धक्काबुक्की सुरू केली. व जमाव आक्रमक झाला.  जमावाचा आक्रमक पवित्रा पाहून महिला पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमाव अधिकच हिंसक झाला. जमावाने महिला पोलिसांचे केस ओढून महिला पोलिसाला खाली पडून मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलिस आणि जमावाच्या  या झटापटीत त्या जखमी झाल्या तसेच  स्वाती पाटील नावाच्या महिला पोलिसांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून हरवले, तर दुसऱ्या महिला पोलिस कर्मचारी  शिला गांगुर्डे याना जमावातील एका व्यक्तीने कडाडून चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले.  दोन्ही जखमी महिला पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण  असून रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!