भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

फिरता नारळी सप्ताह : गरजूंना मिळतेयं मोफत आरोग्यसुविधा

कुंभारखेडा. ता. रावेर. प्रा. योगेश कोष्टी मंडे टू मंडे न्यूज | श्री आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताह निमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने आणि सतपथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र कुंभारखेडा येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.


हे आरोग्य शिबिर दि. १७ ते २४ मार्च २०२६ दरम्यान रावेर रोडवरील श्री क्षेत्र कुंभारखेडा, ता. रावेर जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आले असून शिबिराची वेळ सकाळी १० ते दुपारी ५ अशी राहणार आहे. या शिबिरात नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, तसेच विविध प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या करण्यात येणार आहेत.
तसेच सीबीसी, मलेरिया, टायफॉईड, लिव्हर व किडनी तपासणी, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल व लघवी तपासणी आदी चाचण्या करण्यात येणार आहेत. शिबिरात जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अस्थीविकार, बालरोग, हृदयरोग, कान-नाक-घसा, त्वचारोग, आयुर्वेदिक, दंतरोग व नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून नागरिकांची तपासणी करणार आहेत.


या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना मोफत औषधोपचार तसेच गरजू रुग्णांना मोफत काठ्या व चष्मे वाटप करण्यात येणार आहे. रुग्णांनी येताना रेशन कार्ड, आधार कार्ड मुळपत्र व झेरॉक्स प्रत सोबत आणावे. परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!