अर्थसंकल्पात मोबाईल, टिव्ही.. काय स्वस्त आणि काय महाग ? जाणून घ्या
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भारत सरकारच्या २०२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी यंदा आठव्यांदा भारताचा अर्थसंकल्प मांडला आहे.
अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, महिला, तरूण यांना केंद्रित ठेऊन अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. रोजच्या वापरातील मोबाइल, कपडे, ‘ईव्ही’ कार स्वस्त करत दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला आहे. यावेळीच्या अर्थसंकल्पातील घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले जाणून घेऊया.
काय झाले स्वस्त?
दागिने, इलेक्ट्रोनिक वाहने,
मोबाइल फोन, मोबाइलचे पार्ट
वैद्यकीय उपकरणे
एलईडी आणि एलसीडि टीव्ही, टिव्ही चे पार्ट
चामडीच्या वस्तु
लहान मुलांची खेळणी स्वस्त
भारतात तयार केलेले रेडिमेड कपडे स्वस्त होणार
विमा स्वस्त होणार
कॅन्सर औषधांवारील कुस्तोम ड्यूटि हटवण्यात येणार आहे. ३५ जीवनावश्यक औषधे करामधून वगळली आहेत.
काय झाले महाग?
कपडे , घर महाग होणार आहे.