भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

देशात पुन्हा मोदीच, ‘या’ तारखेला होणार शपथविधी?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशात NDA म्हणजेच भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन करु शकते. एनडीएकडे २७२ या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत. पुढच्या काही राजकीय घडामोडी लक्षात घेता, आता राष्ट्रपती सर्वात जास्त जागा असल्याने भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देऊ शकते.

काल १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. देशाने कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. पण भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९२ जागा जिंकल्या आहेत. तर त्यात एकट्या भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळवला. यात काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा २७२ आहे. घटक पक्ष मिळून भाजपाप्रणीत NDA कडे २७२ या मॅजिक फिगर पेक्षा जास्त जागा आहेत.

दोन पक्ष केंद्रात सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणार
जेडीयूकडे १२ आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीकडे १६ खासदार आहेत. हे दोन्ही पक्ष केंद्रात सत्ता स्थापनेसाठी किंग मेकर ठरणार आहेत. हे दोन्ही पक्ष NDA मध्ये आहेत. ही भाजपासाठी जमेची बाजू आहे. TDP चे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांना फोडण्यासाठी इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करणार यात शंका नाही. पण सध्या, तरी या दोन्ही पक्षांनी आपण NDA सोबतच राहणार आहोत, हे स्पष्ट केलय. त्यामुळे केंद्रात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येऊ शकते. मोदी आणि भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखण हाच इंडिया आघाडीचा उद्देश आहे. इंडिया आघाडीमध्ये जवळपास २० पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या मिळून जितक्या जागा आहेत, त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपाच्या आहेत.

मोदी ९ तारखेला घेणार पंतप्रधानपदाची शपथ?
मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मसाठी ९ जूनला शपथविधी होण्याची शक्यता आहे. आज पासून ९ जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे. येत्या ९ जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात. राष्ट्रपती भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देऊ शकत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!