भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीयसामाजिक

मोदी सरकार बजेटमध्ये १७ कोटी नागरिकांसाठी करणार मोठी घोषणा?

नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’च्या सरकार मध्ये निर्मला सीतारामन या सरकारमध्ये अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. लवकरच नवीन सरकारचं बजेट त्या मांडणार असून त्यात आरोग्य सेवा सुविधांवर भर असण्याची शक्यता आहे. आयुष्मान भारत योजनेआंतर्गत गरीब कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या नवीन सरकारच्या बजेटमध्ये हेल्थकेअरवर प्रामुख्याने भर दिला जाईल अशी शक्यता आहे. देशातील सुमारे १७ कोटी नागरिकांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन या आयुष्मान भारत योजनेची मर्यादा वाढवून ती १० लाख करतील अशी शक्यता आहे. आयुष्मान भारत योजनेत सध्या ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. ही मर्यादा दुप्पट करण्याचा प्रस्ताव सरकारकडे गेला आहे. २३ जुलैला सादर होणार असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन त्याबाबत घोषणा करुन देशातील १७ कोटी लोकसंख्येला दिलासा देतील अशी शक्यता आहे.

सध्या देशातील आयुष्मान भारत योजनेअंतर्गत  सुमारे १२ कोटी कुटुंबांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च पहाता योजनेचं कव्हरेज वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळेच येत्या बजेटमध्ये हे कव्हरेज दुप्पट केलं जाईल अशी शक्यता आहे. या पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७० वर्षांवरील वयाच्या सर्वांना या योजनेत समाविष्ट करुन घेतलं आहे.

आयुष्मान भारत योजनेचं कव्हरेज दुप्पट केल्याने नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीच्या अंदाजानुसार कव्हरेज १० लाख रुपयांपर्यंत वाढवल्यास या योजनेवर १२,०७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येईल. १ फेब्रुवारीला मांडलेल्या अंतरिम बजेटमध्ये आयुष्याम भारत योजनेसाठी ७,२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यात हे १२,०७६ कोटी रुपये वाढले असता या योजनेवरील खर्च सुमारे १९,००० कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी शक्यता आहे. सध्या देशातील १२ कोटी कुटुंब या योजनेची लाभार्थी आहेत. त्या व्यतिरिक्त राष्ट्रपतींनी केलेल्या घोषणेनंतर ७० वर्षांवरील वयाच्या सर्वांचा या योजनेत समावेश केला जाईल. त्यामुळे लाभार्थी संख्येत सुमारे ४-५ कोटीची वाढ होईल. साहजिकच योजनेची लाभार्थी संख्या १७ कोटीपर्यंत जाईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!