भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनराष्ट्रीयसामाजिक

मोदी सरकारचा मोठा निर्णय : कार्यक्रमात आता ‘वंदे मातरम’ गायन बंधनकारक, ‘वंदे मातरम्’ कुठे कुठे अनिवार्य?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | देशभरात प्रत्येक सरकार कार्यक्रमात आता जन-गण-मन या राष्ट्रगीतापूर्वी, वंदे मातरम गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण सहा कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल गृह मंत्रालयानं १० पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले आहेत.

सरकारच्या या नव्या नियमावलीनुसार सर्व नागरिकांना राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरम् सुरू असेपर्यंत सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक आहे. याशिवाय शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने करावी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदराची भावना रुजवावी हा यामागता हेतू असल्याचं सांगण्यात येतं. यावरून आता सत्ताधारी खासदारांनी निर्णयाचं समर्थन केलंय. विरोधकांनी मात्र यावरून सवाल उपस्थित केले आहेत.

वंदे मातरम् कुठे-कुठे अनिवार्य?
तिरंगा फडकावतानाच्या कार्यक्रमांमध्ये
राष्ट्रपतींच्या औपचारिक आगमन-निर्गमनावेळी
राज्यपाल/लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात
नागरी सन्मान कार्यक्रमात
राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करताना (AIR आणि दूरदर्शनवर)
परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज आणताना.
सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक
याशिवाय, सरकारने विशेष आदेश दिलेल्या इतर कार्यक्रमांमध्येही हे राष्ट्रगान वाजवलं जाणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे जर ‘वंदे मातरम’ आणि ‘जन गण मन’ दोन्ही वाजवले जाणार असतील, तर सर्वप्रथम ‘वंदे मातरम’ वाजवलं जाईल. त्यानंतर ‘जन गण मन’ वाजवलं जाईल. या दोन्ही प्रसंगी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक असेल. मात्र, एखाद्या माहितीपट किंवा न्यूज फिल्ममध्ये राष्ट्रगीताचा भाग म्हणून वाजवलं गेलं, तर उभे राहण्याची सक्ती नसेल.

याशिवाय शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने करावी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदराची भावना रुजवावी हा यामागता हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे १८७५ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या संपूर्ण वर्षासाठी देशव्यापी मोहिमेचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंदांचा नियम होता, मात्र वंदे मातरमसाठी कोणताही औपचारिक नियम नव्हता. परंतु आता सरकारने खालील बदल केले आहेत.
सहा अंतऱ्यांचे गीत: अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे सहा अंतरे गाणे किंवा वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वेळ: या पूर्ण गीताचा कालावधी ३ मिनिटे १० सेकंद निश्चित करण्यात आला आहे.
सावधान मुद्रा: जेव्हा जेव्हा राष्ट्रीय गीत वाजवले जाईल, तेव्हा प्रेक्षकांना ‘सावधान’ स्थितीत उभे राहावे लागेल.
आधी वंदे मातरम, मग राष्ट्रगीत: जर एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत दोन्ही वाजवायचे असतील, तर आधी ‘वंदे मातरम’ वाजवले जाईल आणि त्यानंतर ‘जन गण मन’ होईल.

नव्या मार्गदर्शक सूचना: कुठे आणि कधी वाजवले जाईल?
पुढील अधिकृत प्रसंगी वंदे मातरमची ३ मिनिटे १० सेकंदांची आवृत्ती वाजवणे बंधनकारक आहे. त्या नागरी सत्कार समारंभात. राष्ट्रपतींच्या अधिकृत सरकारी कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि शेवटी. राष्ट्रपतींनी आकाशवाणी किंवा टेलिव्हिजनवरून देशाला संबोधित करण्यापूर्वी आणि नंतर. राज्यपाल/उपराज्यपालांच्या अधिकृत सरकारी कार्यक्रमांच्या वेळी. परेडमध्ये जेव्हा राष्ट्रीय ध्वज (तिरंगा) आणला जाईल, याचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!