मोदी-शहांकडून पुन्हा धक्कातंत्र? मुख्यमंत्री पदासाठी महिला चेहरा, फडणवीस की मराठा चेहरा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात महायुतीच्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस अशी चर्चा रंगली असता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं असं शिवसेना नेत्यांची मागणी असताना शिंदे च दावेदार असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यातच शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाचा दावा सोडत त्यावर पडदा टाकला. आणि भाजपचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा केला. आता भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. पण आता वेगळाच पॅटर्न समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेकांकडून मोदी आणि शाह हे राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवत वर्तविण्यात येत आहे. काहींच्या मते लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतं दिली. लाडक्या बहिणींच्या मताचा हा वाढीव टक्का महायुतीच्या विजयासाठी जोरकस ठरला. त्यामुळे ज्या मुद्याची राजकारणात चर्चा होत नाही, असाच मुद्दा अजेंड्यावर येऊ शकतो. अर्थात कदाचित राज्यात महिला मुख्यमंत्री होऊ शकते. अशीही दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेगवेगळे तंत्र वापरण्यात भाजप माहीर आहे. त्या मुळे ही शक्यताही नाकारण्यात येत नाही. ह्या जर तर क्या गोष्टी असल्या तरी जर महिला मुख्यमंत्री होत असेल तर कोणाची लॉटरी लागू शकते?
मध्यप्रदेशसह राजस्थानमध्ये भाजपाने यापूर्वी वेगळे प्रयोग करून सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे राजकारणात मध्यप्रदेश, राजस्थान हा पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? असाही काही तज्ञ दावा करीत आहेत.
आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की मराठा उमेदवार देणार का ऐन वेळी मुख्यमंत्री म्हणून महिलेला पुढे केले जाते. असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.