“मंडे टू मंडे न्यूज” च्या वृत्ताची दाखल…खिर्डी येथील दोर बांधून आधार दिलेल्या इलेक्ट्रिक पोल च्या समस्येला अखेर पूर्णविराम!
खिर्डी. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथे महावितरण कंपनी ने भर वस्तीत बाजार पट्यातील विद्युत प्रवाह असलेल्या “इलेक्ट्रिक पोल ला दिला दोरीचा आधार ” या मथळ्याखाली दोन दिवसापूर्वी “मंडे टु मंडे न्युज” ने बातमी प्रसिद्ध केली होती.
सविस्तर वृत्त असे की गेल्या १५ दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाऱ्याने रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथील बाजार पट्टयातील लिंबाचे झाड पडून विद्युत इलेक्ट्रिक तार तुटले जाऊन पोल पूर्णपणे एका बाजूने वाकला गेल्याने त्याला काढून किंवा नवीन पोल न उभारता महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी अजब शक्कल लढवली होती चक्क तुटलेल्या झाडाच्या खोडाला दोर बांधून त्याला आधार देण्याचं काम केले होते.
सदर “मंडे टु मंडे न्युज” च्या वृत्ताची दखल घेत मतदारसंघ चे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी लागलीच त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना देत महावितरण कंपनीने चे अधिकारी ठेकेदार यांना रहिवाश्यांना होत असलेल्या अडचण व धोका बाबत माहिती दिली.त्यानुसार त्यांनी तात्काळ दुरुस्ती व नवीन पोल उभारण्याचे कार्यवाही करून कामाला सुरवात केली. त्याबद्दल परिसरातील रहिवाशी /नागरिकांनी लोकप्रतिनिधी व पत्रकार, व मंडे टु मंडे न्युज चे कौतुक करत आभार व्यक्त केले.