१००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा चलनातून बंद होण्याची शक्यता
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली (वृत्तसेवा): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर होऊ शकतात. मार्चनंतर आरबीआय सर्व जुन्या नोटा चलनातून बाहेर करू शकते. 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून काढण्याचा आरबीआयचा विचार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टेंट जनरल मॅनेजर बी महेश यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बी महेश यांनी जिल्हा स्तरीय सुरक्षा समिती अर्थात डिस्ट्रिक्ट लेवल सिक्योरिटी कमिटी मिटिंगमध्ये हे सांगितलं आहे. 100 रुपये, 50 रुपये आणि 5 रुपयाच्या जुन्या नोटांच्या बदल्यात, नव्या नोटा आधीच सर्कुलेशनमध्ये आल्या आहेत. त्यामुळे जुन्या नोटा बंद केल्यास लोकांना समस्या येणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की, नोटबंदीवेळी लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आरबीआय आधी हे निश्चित करेल की, जितक्या जुन्या नोटा सर्कुलेशनमध्ये आहेत, तितक्याच नोटा मार्केटमध्ये याव्यात, जेणेकरून लोकांना कोणतीही समस्या येऊ नये.
तसंच ही सीरीज अचानक बंदही केली जाणार नाही. आरबीआय वेळोवेळी जुन्या नोटा परत घेऊन, नवीन नोटा जारी करते. नकली नोटांवर लगाम घालण्यासाठी आरबीआयकडून हे पाऊल उचललं जातं. बँकेने अधिकृतरित्या घोषणा केल्यानंतर, सर्वांना सर्व जुन्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतात. 2019 मध्ये आरबीआयनं 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. पण तरी 100 रुपयांच्या जुना नोटाही ग्राह्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण आता 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा विचार आहे.