भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुढील पाच दिवस मान्सून राज्यात जोरदार हजेरी लावणार, “या” जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्रात मान्सून पुढील पाच दिवस जोरदार हजेरी लावणार असून, हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पावसाचा अंदाज दिला आहे.तर पालघर मध्ये आज १४ जून रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या ५०- ६० किमी प्रतितास वेगाने जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळेल. त्यानंतर १५ ते १७ जूनपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी होऊन मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित आहे.

जळगाव जिल्हा बद्दल जळगाव साठी आज विजांसह ४०–५० किमी प्रतितास वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तर तारीख १५ ते १७ जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्याच बरोबर १४ जून रोजी नाशिक जिल्ह्यातही वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून १५ ते १७ जून दरम्यान कमी स्वरूपाच्या सरी पडतील. त्याच प्रमाणे मराठवाड्यात संभाजीनगर, बीड,जालना, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, १४ ते १७ जून दरम्यान वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.

आज १४ जून रोजी अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशिममध्ये ५०- ६० किमी प्रतितास वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस अपेक्षित आहे. १५ ते १७ जून दरम्यान संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह, वादळी वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे, विशेषतः बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे.

धुळे आणि नंदुरबारमध्ये १४ ते १६ जून दरम्यान प्रति तास ३९ – ५० वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस राहील तर १७ जूनला हलका पाऊस राहील.

१४ जून ला कोल्हापूर जिल्ह्यात अति जोरदार पाऊस आणि ५०- ६० किमी प्रतितास वारे वाहतील, तर १४ ते १७ या काळात घाटमाथ्यावर अति पावसाची शक्यता आहे. शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतही अशाच प्रकारचा पावसाचा अंदाज आहे

पुढील दोन दिवस  मुंबईत जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि ५० – ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्या नंतर पावसाचा जोर कमी होऊन मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे.  रायगड मध्ये विजांसह आणि वादळी वाऱ्यांसह अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे. ते १५,१६ , १७ जून रोजी ही येथे काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील, तर काही तुरळक व  ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

१४ ते १५ जूनला अहिल्यानगर  जिल्ह्यात  विजांसह ४०- ५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. तर १६ व १७  जून रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा गडगडाटासह सरी कोसळतील.

१४ व १५ जून साठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज जारी आहे. विजा आणि वाऱ्यांमुळे धोका असून १६ व १७  जूनला या जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा जोर राहील. पुणे शहर आणि घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह आज जोरदार पाऊसाची शक्यता आहे. तर पुण्यात ,१५ ते १७  जून दरम्यान पुणे शहरात हलका ते मध्यम पाऊस, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!