मोठा वाघोदा येथे ११९ आदिवासींना खावटी किट वाटप, अनेक पात्रं लाभार्थी वंचित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मोठा वाघोदा,ता.रावेर.मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्य.सहकारी आदिवासी विभाग महामंडळ , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तर्फे मोठा वाघोदा येथील ११९ आदिवासी तडवी भिल समाजाचे पात्र लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मुबारक (राजू )अलीखा तडवी यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी,संजय माळी,हर्षल पाटील, सुलतान बुर्हाण, युसूफ मिस्रीखा,भिकारी न्यामतखा, उत्तम वाघ, यांचे हस्ते खावटी अनुदान योजनेअंतर्गत धान्य किटचे वाटप करण्यात आले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या आदिवासींना या खावटी किटमध्ये साखर , तेल ,. हरभरा , चवळी , मटकी , वटाणा , तूरडाळ , उडीद डाळ , गरम मसाला , मीठ , चहा पावडर , मिरची पावडर ,या वस्तूंचा समावेश आहे अडचणीच्या काळात आदिवासी विभागातर्फे खावटीच्या रुपाने मदत मिळाल्याने अनेकांच्या संसारास हातभार लागला व त्यानी समाधान व्यक्त केले मात्र उर्वरित पात्र २५ते ३० लाभार्थ्यांची नावे यादीत न आल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चे प्रकल्प अधिकारी यांनी या पात्र लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी या वंचित गरजूंनी यावेळी केली
खावटी अनुदान किटचे वाटपासाठी पाल आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गोविंदा दपाडू अत्तरदे,भागवत ग्यानसिंग पारधी, नरेंद्र पंढरीनाथ साठे,विजय सुपडु पाटील, श्रीमती सविता भागवत पाचपांडे,श्रीमती जयश्री कडू बर्हाटे, सुवर्णा पितांबर पाटील,संजय गोपाळ इंगळे,प्रमोद पांडूरंग पाटील,विजय तुकाराम कुमावत विनायक रामदास चौधरी , भिकारी रुबाब तडवी ,सुपडू महेबुब तडवी सलमान तडवी, युसुफ महंमद प्रकाश वायके राहुल महाजन, पंकज मालखेडे आदिंनी परिश्रम घेतले