राज्यस्तरीय वृत्तपत्र विक्रेता अधिवेशनाला तापी पूर्णा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग
मोठे वाघोदा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वृत्तपत्र विक्रेत्यांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर येथे संपन्न झाले. ठाणे येथे होणारे राज्यस्तरीय अधिवेशन कोरोनाच्या निर्बंधामुळे स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे चंद्रपूर येथे २ मे रोजी राज्यस्तरीय अधिवेशन सर्वानुमते चंद्रपूर येथे घेण्यात आले.
चंद्रपूर येथील राजीव गांधी क्रिडा संकुलात अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली असून गावातील मुख्य मार्गावरून संघटनेचे मानचिन्ह घेऊन रॅली काढण्यात आली. या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक वनमाला सत्यम चेअरमन तेलंगाणा न्युज पेर्क्स सेलर्स कन्वेनिंग कमेटी तेलंगाणा, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधिरभाऊ मुनगंटीवर, आमदार बल्लारपूर विधान सभा असून प्रमुख्य अतिथी डॉ. अजय गुल्हाणे जिल्हाधिकारी चंद्रपूर, श्रीपाद अपराजित संपादक महाराष्ट्र टाईम्स नागपूर, सुरेश तालेवार माजी सचिव जिल्हा बार असोसिएशन होते. तर प्रमुख्य उपस्थिती हरिशचंद्र पवार मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना, बालाजी पवार नांदेड सरचिटणीस महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना, गोरख भिल्लारे पंढरपूर कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना, शिवगोडा खोत इचलकरंजी सल्लागार महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना उपस्थित होते. तर विभागीय उपाध्यक्ष दिनेश उके गोंदिया, विकास सुर्यवंशी सांगली, नरहरी आवठी मुंबई, अन्नासाहेब जगताप औरंगाबाद, गोपाळ चौधरी जळगाव, ज्ञानेश्वर धुमाळ कसारा, श्रीराम खत्री यवतमाळ, त्याच बरोबर तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय निंबाळकर वरणगाव, सचिव गणेश पाटील उटखेडा, संपर्क प्रमुख्य उज्वल मराठे तळवेल, सदस्य प्रल्हाद महाजन बलवाडी, कमलाकर माळी वाघोदा, संदिप कर्जोदकर कर्जाद, विनोद सैतवाल चिनावल, उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेता हा घटक संघटीत करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचे काम हि संघटना करीत आहे. वृत्तपत्र विक्रेता उन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम करीत आहेत. हि एक सेवाच असून समाजात जागृती करणे अशा विविध क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्वतंत्र कल्याणकारी मंडळ आवश्यक आहे. पेन्शन, आरोग्य, शेक्षणिक अशा सर्व योजना वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राबवाव्या शासकीय घरकूल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करावा अशा अनेक माग्यण्या आहेत.