वाघोदा येथील माळी परीवाराने दशक्रिया दिवशी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश…
Monday To Monday NewsNetwork।
स्व.योगेश माळी यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत वृक्षारोपण…
मोठे वाघोदा. ता. रावेर( प्रतिनिधी)।कोरोनाने या दोन वर्षात आपल्याला भरपूर शिकवल.तसेच राज्यात व जिल्ह्यात आँक्सिजन च्या तुटवड्यामुळे ही भरपूर जणांना आपला जिव गमवावा लागला .झाडांची होणारी कत्तल याचे हे दुष्परिणाम आहेत झाडे हे आँक्सिजन देण्याचे काम करतात आणी झाडांमुळे आपल्याला आँक्सिजन मिळण्यास मदत होते.या विषय मनी धरुन रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील ग्रामपंचायत सदस्य संजय माळी यांचे छोटे बंधू तर पत्रकार कमलाकर माळी यांचे चुलत बंधू योगेश माळी यांचा दशक्रिया विधी आज पार पडला.
स्व योगेश माळी यांचे स्मरण रहावे व वृक्षसंवर्धन सप्ताहात आपले ही योगदान व्हावे या उद्देशाने वाघोदा येथील माळी परीवाराने निंभोरा रोडवरील स्मशानभूमी परीसरात वड.पिंपळ.निंब.उंबर.अशा प्रकारची 11 वृक्ष लाऊन त्यांना पाणी घालुन ते जगवण्याचा निर्धार करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे त्यावेळी वृक्षारोपण रावेर अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.त्यावेळी पद्माकर महाजन.रावेर, बापु माळी.यावल विजय माळी साकळी.गोकुल गौरखेडे.बाळु काकडे.बंडु माळी.हेमंत ठाकूर गजानन माळी अरविंद माळी.जगन्नाथ माळी.गजानन माळी.मुळा माळी. ग्रा प सदस्य संजय माळी.तसेच माळी परीवारातील सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच वृक्षारोपण करुन मोकळे होऊ नका तर लावलेल्या वृक्षांची काळजी व संगोपनासाठी ते जगवण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती ही या परीवारातर्फे या वेळी करण्यात आली.