भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होणार– सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्टवर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे पंचायत निवडणुका आरक्षणाशिवाय होणार आहेत. तसंच सरकारने १५ दिवसांत पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांची अधिसूचना जारी करावी, असे ही आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

मध्य प्रदेशात ओबीसी अरक्षणाशिवय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.  शिवराज सिंग चौहान सरकारला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. मध्यप्रदेश सरकारनं ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागितला होता. पण आज सर्वोच्च न्यायालयानं यावर निकाल जाहीर केला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घेण्याचे आदेश दिले. ओबीसी आरक्षण  प्रकरणी एका आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा, तात्काळ निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!