बस कालव्यात कोसळून भीषण अपघात; ३९ प्रवाशांचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मध्यप्रदेश (वृत्तसेवा) :- मध्यप्रदेशात सतनाच्या दिशेने जात असताना सिधी जिल्ह्यात बस कालव्यात कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. ७ प्रवाशांना वाचवण्यात आले असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
आज सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले तर ३९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते असून उर्विरीत लोकांचा शोध सुरू आहे. कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली आहे.