भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर व द युनिक अकॅडमी पुणे, शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवशीय पदवी काळात MPSC /UPSC स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्र.प्राचार्य डॉ. ए. जी . पाटील तर प्रमुख व्यक्ते म्हणून श्री.विकास गिरासे हे होते . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. सत्यशिल धनले यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विकास गिरासे आणि नरेंद्र पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एमपीएससी,यूपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षा, इंटरव्यू याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी असणारी मानसिकता, वेळेचे नियोजन, संयम, सकारात्मक दृष्टिकोन विविध यशस्वी व्यक्तींचे अनुभव व संघर्ष विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आपण ही जिद्दीने, मेहंतीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो असा आशावाद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. जी पाटील यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र याचा परिपूर्ण उपयोग करून द्यावा, तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे करिअर म्हणून बघावे. असे आव्हान उपस्थित विद्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमाचे आभार , प्रा. डॉ. एस.बी. गव्हाड यांनी केले. सदर कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!