मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या तिन भाविकांचा मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने कार शिवशाही बसवर धडकल्याची घटना आज घडली.त्यात नवरात्र निमित्त मनुदेविच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना ८ ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी यावल चोपडा रस्त्यावर घडली. त्यात दोघे भावंडं आहेत.
साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब कार मधून मंगळवार रोजी मनुदेवीच्या दर्शना साठी जात असताना कारचे टायर फुटल्याने ती कार चोपडा धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ शिवशाही बसवर आदळली. त्यात शैलेश श्रीधर वाणी. वय ३४ वर्ष. निलेश श्रीधर वाणी. वय ३० वर्ष. या दोन्ही भवांडासह जितेंद्र मुरलीधर भोकरे. वय ४७ वर्ष. यांचा मृत्यू झाला.तर कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.