मुक्ताईनगरला जुगार अड्ड्यावर धाड; आठ जणांवर कारवाई साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। खामखेडा रस्त्यावर एका शेतामध्ये जुगार अड्डा चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला यात दोन लाख 80 हजार रुपये रोख रकमेसह सहा हजार रुपयाची विदेशी दारू तसेच पाच मोटर सायकल असा एकूण पाच लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त माहिती मिळालेने त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक यांच्यासह पथकातील विकास वाघ ,संजय हिवरकर ,दीपक चौधरी ,राजेश मेढे, रवी नरवाडे, रमेश चौधरी, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी ,निशांत तडवी ,यांच्या पथकाने सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकला याप्रसंगी अजय अरुण जावरे, मनोज नामदेव जाधव ,निलेश लीलाधर वाणी ,विनोद ज्ञानदेव कांडेलकर ,निलेश कडू तळेले, राजेश प्रकाश जावरे, शेख बिस्मिल्ला शेख सांडू ,विठ्ठल कडू तळेले अशा आठ जणांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली व नंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली